जळगाव (प्रतिनिधी) – समाजातील दात्यांची संख्या खूप असून घेणार्यांची संख्या कमी असल्याची अनुभूती अनेकदा येते. डॉ. कमलाकर पाटील यांनी आयोजीत केलेल्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरातून हीच बाब पुन्हा अधोरेखीत झाल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. फुपणी येथे अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.
फुपणीचे माजी सरपंच डॉ. कमलाकर पाटील यांनी अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते . नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विवेक पाटील आणि डॉ. वृषाली पाटील यांनी रूग्णांची अल्प दरात शस्त्रक्रिया केली. समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. कमलाकर पाटील, डॉ. विवेक पाटील, डॉ. वृषाली पाटील, माजी पं. स. उपसभापती शितल पाटील यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक डॉ. कमलाकर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले . आभार प्रफुल्ल पाटील यांनी मानले.