रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार वाद हायकोर्टात जाण्याची शक्यता
जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील १४ लोकप्रतिनिधींच्या जिल्हा बँक संचालक मंडळ निवडणुकीसाठीच्या उमेदवारीवर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी हरकत घेतली आहे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार आपल्या हरकतीच्या भूमिकेवर हायकोर्टात जाऊ , असेही दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले.
माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , भारतीय रिझर्व्ह बँकेच्या २ ऑगस्ट २०१९ रोजीच्या आणि त्यात ३ जून २०२० रोजी केलेल्या सुधारणेनुसार लोकप्रतिनिधींना जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लढवता येणार नाही तरीही जिल्ह्यातून १४ लोकप्रतिनिधींनी या निवडनुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत . या संदर्भात योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी दीपककुमार गुप्ता यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
दीपककुमार गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार , भारतीय रिझर्व्ह बँकेच्या या आर बी आय / डी बी आर / २०१९ – २० /७१ परिपत्रकानुसार लोकनियुक्त म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार , खासदार , नगरसेवक , स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य आदी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संचालक मंडळाची निवडणूक लढाऊ शकत नाहीत , तरीही जिल्ह्यात असे उमेदवारी अर्ज दाखल केले गेले आहेत .
खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार संजय सावकारे , आमदार गिरीश महाजन , आमदार राजूमामा भोळे , आमदार मंगेश चव्हाण , आमदार चिमणराव पाटील , आमदार किशोर पाटील , आमदार अनिल भाईदास पाटील , महापौर जयश्री महाजन , भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे , पारोळ्याचे नगराध्यक्ष करणं पवार , पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अमोल पाटील, जि प सदस्य आर जी पाटील , या १४ लोकांच्या उमेदवारीवर ही हरकत घेण्यात आली आहे