जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील जुने जळगाव भागातील आंबेडकनगरातील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले
जुने जळगाव भागातील आंबेडकनगरातील रहिवाशी लक्ष्मी सचिन सैंदाणे या २९ वर्षीय विवाहित महिलेने काल दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली . या महिलेच्या कुटुंबीयांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले . जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या सीएमओ नम्रता अच्छा यांनी दिलेल्या माहितीवरून शनी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या महिलेने गळफास घेतला तेंव्हा घरात कुणीच नव्हते तिचे काका कामावर गेलेले होते . तिच्या पश्चात पती , ८ वर्षांचा मुलगा संघर्ष , ५ वर्षांची मुलगी आरुश्री असा परिवार आहे तिचा पती सचिन सैंदाणे हा भा द वि कलम ३०७ दाखल गुन्ह्यात गेल्या ५ वर्षांपासून जळगाव जिल्हा कारागृहात बंदी आहे.