पुणे ( प्रतिनिधी ) – चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने नवोदित अभिनेत्रीवर बलात्काराची घटना घडली आहे. 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी पुण्यात शॉर्ट फिल्म मेकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपासून तो तिच्यावर बलात्कार करत होता.
समीर बाळू निकम असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी समीर हा यूट्यूबवर शॉर्ट फिल्म बनवतो. त्याने यूट्यूबवर काही लघुपट आणि गाणीही बनवली आहेत. चित्रपट आणि मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने त्याने 31 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सलग दोन वर्षांपासून तो तिच्यावर बलात्कार करत होता. पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.