चाळीसगाव (प्रतिनिधी) – चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड येथे एकाने बंद घरफोडून १७ हजार रूपये किंमतीचा एलसीडी टीव्ही चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरखेड गावातील कोळीराम भवडु यांच्या घरातील भाडेकरून डॉ. संतू मंडळ यांचे बंद घर फोडून घरातील १७ हजार रूपये किंमतीची एलसीडी टीव्ही चोरून नेणाऱ्या संशयित आरोपी गोकुळ हंसराज राठोड रा. सांगवी, ता.चाळीसगाव याला निलेश विष्णु सुर्यवंशी या तरूणाने पकडले. त्यांला चाळीसगाव ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी निलेश सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोकुळ राठोड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रविण संगिले करीत आहे.