जळगाव ( प्रतिनिधी ) – सध्याच्या राजकीय परिस्थितीत आता महापौर सेनेच्या असल्या तरी भाजपचं बहुमतात राहणार आहे म्हणजे सत्ता आमचीच आहे , असे सांगत आज माघारी आलेल्या नगरसेवकांचा आकडा धरून महापालिकेतील भाजपचे संख्याबळ ४३ झाले असल्याचे स्पष्ट केले.
महापालिकेतील राजकारणाबद्दल बोलताना आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की , आधी आमचे ५७ नगरसेवक होते मध्यंतरी काही नगरसेवक शिवसेनेकडे गेले आता आमचे संख्याबळ ४३ वर आले आहे . अजूनही काहीजण अनावधानाने आमची चूक झाली आम्हाला पक्षातच राहायचे आहे असे म्हणत आहेत त्यामुळे माझा अंदाज आहे की शिवसेनेकडे गेलेल्या नगरसेवकांपैकी ९० टक्के नगरसेवक परत येतील . शिवसेना आणि भाजपची महापालिकेत युती होईल कि नाही हे किंवा याबद्दल मी आताच काही सांगू शकत नाही . शहरातील त्रासाला जळगावकर कंटाळलेले आहेत आमदार भोळे काल म्हणाले तसे आम्ही विकासाच्याच मताचे आहोत बहुमतामुळे स्थायी समिती आणि अन्य समित्यांचे सभापती आमचेच असतील , असेही ते म्हणाले
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठीच्या सर्वपक्षीय पॅनलमधून बाहेर पडण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेबद्दल आमदार गिरीश महाजन म्हणाले की , भाजपमुळे आम्ही या सर्वपक्षीय पॅनलमध्ये सहभागी होत नाही असे काँग्रेस म्हणत असले तरी त्यांच्या या म्हणण्यात काहीही तथ्य नाही , गेल्या निवडणुकीत जिल्हा बँकेवर काँग्रेसचा फक्त चोपड्यातुन १ संचालक निवडून आला होता यावेळी आम्ही सर्वपक्षीय पॅनलमध्ये तरीही त्यांना २ जागा दिल्या आहेत जिल्ह्यात काँग्रेसचा प्रभाव ना राजकारणात ना सहकारात , मग ते कशाच्या बळावर असे दावे करीत आहेत ? , जिल्हा परिषदेतसुद्धा अन्य पक्षांच्या तुलनेत नगण्य जागा असताना त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी सर्वपक्षीय सामंजस्यामुळे सव्वा वर्षासाठी मिळते आहे त्यांची भूमिका अशीच राहिली तर त्यांना अशा संधी यापुढे कशा मिळतील ? , जिल्हा बँकेच्या त्यांच्या एका जागेवरही आताच बंडाळी झाली आहे त्यांना त्यांचाच आत्मविश्वास नसल्याने ते अशी पळवाट काढणारी भूमिका घेत असावेत त्यांना जिल्ह्यात जिल्हा बँकेसाठी १६ उमेदवार मिळतील आणि निवडून येतील अशी परिस्थिती नाही जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलमधून काँग्रेस बाहेर पडणार असेल तरी राष्ट्रवादी , भाजप व शिवसेना एकत्र राहतील . राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथराव खडसे यांना जिल्हा बँकेसाठी दिलेल्या उमेदवारीबद्दल माझ्या त्यांना सदिच्छाच आहेत कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे त्यावर मी काय सांगणार ?, राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वपक्षीय पॅनलमध्ये मिळालेल्या जागांपैकी त्यांनी अर्ध्या जागा खडसे परिवाराला दिल्या तरी आमची काही हरकत नाही ! , असेही ते म्हणाले .