जळगाव ( प्रतिनिधीं ) – ४३ नगरसेवकांच्या संख्याबळाचा भाजपने आज जाहीर दावा केल्याने महापालिकेतील राजकारण पुन्हा बदलाच्या टप्प्यावर आल्याचे समजले जात आहे . आता या आव्हानाचा मुकाबला पालकमंत्री गुलाबराव पाटील , महापौर जयश्री महाजन , उपमहापौर कुलभूषण पाटील , नितीन लढ्ढा , विरोधी पक्षनेते सुनील महाजन कसा करतात यावर पुढचे डावपेच दिसून येणार आहेत . दरम्यान गटनेते पदाचा काहीच उल्लेख महापालिका कायद्यात नाही आणि गटनेते शब्दाची कायदेशीर व्याख्याही नाही असे सांगतअँड. दिलीप पोकळे यांनीही खळबळ उडवून दिली आहे.

महापालिकेची आजची महासभा तहकूब झाल्यानंतर भाजपच्या गोटातील हालचाली वेगवान झाल्या आहेत . भाजपच्या जाणकार पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज महापालिकेच्या महासभेत स्थायी समिती , महिला व बालकल्याण समिती सदस्यांसह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीची घोषणा होणार होती. मात्र भाजप आणि शिवसेनेच्या मागणीमुळे आजची महासभा तहकूब करण्यात आली गटनेता जी सुचवेल ती नावे महासभेत सभागृहात वाचली जाणे नियमानुसार अपेक्षित असते मात्र तसे झाले नाही. काल आम्ही अशी माहिती महापौर आणि आयुक्तांना दिली होती काल गटनेत्यांनी बैठक महापौरांनी घेतली नाही असा आमचा दावा आहे. आमच्याकडे आता ४३ नगरसेवकांचे संख्याबळ आहे जे १२ नगरसेवक शिवसेनेत गेले होते ते आता परत भाजपकडे आले आहेत हे १२ नगरसेवक आज जी एम फाउंडेशनच्या कार्यालयात येऊन भेटून गेले असेही या पदाधिकारयांनी सांगितले .
या घडामोडींबद्दल आमदार राजूमामा भोळे म्हणाले की , सुबह का भूल श्याम को घर आये तो उसे भूल नही कहाते , भाजपमध्ये परत आलेल्या नगरसेवकांचे आम्ही स्वागत केले आहे आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास कायम आहे
भाजपने केलेल्या दाव्यानुसार प्रतिभा पाटील , मीनाक्षी पाटील , कांचन सनकत , रंजना सपकाळे , दत्तू कोळी , प्रिया जोहरे , शोभा बारी , सुरेश सोनवणे , शरीफाबी शेख , प्रवीण कोल्हे , रुकसानाबी बबलू खान , मीना सपकाळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी भाजपला पाठींबा दिला आहे हा आकडा सायंकाळपर्यंत वाढू शकतो म्हणून आम्ही अन्य नागरसेवकांच्याही पाठींब्याचा दावा करीत आहोत असे आमदार राजूमामा भोळे यांनी सांगितले .
दुसरीकडे भाजपचा गटनेता आपण आहोत असा दावा करणारे दिलीप पोकळे यांनी सांगितले की , २९ सदस्यांची बैठक सभागृह नेत्यांनी त्यावेळी बोलावली होती. त्यात गटनेत्याची व उपगटनेत्याची निवड झाली भाजप कागदपत्रे खोटी आहेत असे म्हणत असले तरी त्यात तथ्य नाही , त्यानंतर महापौर आणि आयुक्तांनी गटनेता नोंदीचे अधिकार आपल्याकडे नसल्याचे सांगितले होते . काल अधिकृत गटनेता म्हणून मला महापौरांनी गटनेत्यांच्या बैठकीत बोलावले होते . त्यामुळे हा विषय आता संपलेला आहे . आमची कागदपत्रे बनावट कशी ? , याचा खुलासा भाजपने करावा . ते दावा करतात तसे विभागीय आयुक्तांचे वेगळे पत्र नाहींचय . गटनेते पदाचा काहीच उल्लेख महापालिका कायद्यात नाही आणि गटनेते शब्दाची कायदेशीर व्याख्याही नाही असे सांगत दिलीप पोकळे यांनीही खळबळ उडवून दिली आहे.
याच मुद्द्यावर भगत बालाणी यांनी सांगितले की , स्वीकृत सदस्य निवडीला आमची हरकत नाहीच . भाजप गटनेत्याला कालच्या बैठकीला का बोलावले नाही ? , याचे उत्तर महापौरांनी द्यावे . आम्ही आमचे म्हणणे महासभेत मांडण्याला जर महापौर गोंधळ घालणे म्हणत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे . मी तर महासभा तहकूब करण्याच्या निर्णयाबद्दल महापौर जयश्री महाजन आणि नितीन लढ्ढा यांचेही आभार मानतो . यापुढे तरी ते नियम पाळतील अशी आशा आहे आमच्याकडे ४३ नगरसेवकांचे संख्याबळ आहेच . आता परत भाजपमध्ये आलेले नगरसेवक आम्ही भाजपचेच असल्याचे सांगत आहेत ते फक्त पदासाठीच बोलत आहेत का असे माझे म्हणणे आहे . त्यांचे हे म्हणणे कसे योग्य म्हणावे असाही माझा मुद्दा आहे,असेही ते म्हणाले.







