जळगाव ( प्रतिनिधी ) – पिंप्राळा हुडको भागातील सिद्धार्थनगरातील एका तरुणाने राहत्या घरात गळफासाने आत्महत्या केल्याची घटना आज घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हीतेश नाना बाविस्कर ( वय 24) असे या तरुणाचे नाव आहे . त्याने आत्महत्या केल्याचे आज सकाळी १० वाजता उघडकीस आले . रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये गुरनं 54 / 2021 नुसार आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . या तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र लगेच समजू शकले नाही.







