जळगाव ( प्रतिनिधी )- प्रामुख्याने रिक्षा आणि दुचाकीसारख्या अशा छोट्या वाहनाच्या दररोज होणाऱ्या लहान -मोठ्या अपघातांमुळे शहरातील रस्त्यांची दुर्दशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
महानगर पालिका प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे मयूर कॉलनी, सोनी नगर, गणपती नगर, हुडको, आझाद नगर, माधव नगर, ओंकार पार्क, अपना घर, सुख अमृत नगर, कुंभार वाडा, बारी वाडा, भाई वाडा सह अनेक कॉलनी भागातील नागरिकांचे या रस्त्यावरून दररोजचे येणे जाणे आहे. हुडको ते पिंप्राळा दरम्या दररोज हजारो वाहनांची रहदारी असते . रिक्षा चालक व दुचाकी चालकांना या रस्त्यावरून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे पावसामुळे पिंपराला चौक ते गणपती नगर रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे या रस्त्यांवर दररोज दुचाकीस्वारांचे अपघात होत असून अनेक जणांना दुखापती झाल्या आहेत







