जामनेर (प्रतिनिधी) पोलिसांनी काल मोठी कारवाई करीत तालुक्यातील तळेगाव व गाडेगाव येथील अवैध गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले .
अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारू तयार करणा-या या आरोपीवर कारवाई करण्यात आली काल
पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या आदेशाने केलेल्या या कारवाई मध्ये अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उप विभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे स फ़ौ संजय पाटील, पोहेकॉ रमेश कुमावत, सुनिल राठोड, पोना रामदास कुंभार पो.कॉ. तुषार पाटील, निलेश घुगे यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केलेली आहे.
तळेगाव येथे जितेंद्र कोळी ( रा. तळेगाव ) यांच्या ताब्यातून 5000 /- रुपये किंमतीची 70 लिटर गावठी हातभट्टीची दारू व 15000 /- रुपये किंमतीची बजाज प्लॉटीना मोटर सायकल जप्त केली
दुसरा आरोपी प्रकाश वसंत कोळी (रा. तळेगाव ) यांच्या ताब्यातून 5000 /- रुपये किंमतीची 70 लिटर गावठी हातभट्टीची दारु व 10000 /- रुपये किंमतीची हिरो होन्डा मोटर सायकल जप्त करण्यात आली
गाडेगाव शिवारात आरोपी जितेंद्र पवार , सुनिल सोनवणे , अर्जुन जाधव व शेत मालक उमांकात वराडे (सर्व रा. गाडेगाव) यांच्या कडून 4500 /- रुपये किमतीचा 200 लिटर मापाचा लोखंडी ड्रम , 150 लिटर उकळते रसायन , प्लॉस्टीकची नळी व प्लॉस्टीकच्या कॅन असे
1,04,000/- किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले
13 प्लॉस्टीक ड्रम प्रत्येकी 200 लिटर मापाचे व त्यात 2600 लिटर दारुचे रसायन 4400/-रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.1,00,000 /- रुपये किमतीची होन्डा युनिकॉन मोटर सायकल ( क्र एम एच 19 डीके 4511) असा एकुण 2,47,900/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जामनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही गेल्या 12 वर्षातील मोठी कारवाई ठरली आहेता तालुकाभरात पोलिसांचे कौतुक केले जात आहे