चोपडा (प्रतिनिधी) – उच्च न्यायालय , विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये शनिवारी येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली होती दिवाणी व फौजदारी प्रलबित २०७ पैकी ३२ तर बँक, म.रा.वी.म., बीएसएनएलच्या दाखलपूर्व २११७ पैकी ६० दावे तडजोडीने निकाली काढण्यात आले त्यातून वसुली ६१ लाख १९ हजार ४०९ रुपये करण्यात आली
या लोक न्यायालयाच्या पॅंनलवर दिवाणी न्यायाधीश डी. जी. म्हस्के यांच्यासमोर पंच म्हणून ऍड. एस. आर. शर्मा अँड. ए. ए. हुसेन , चोपडा वकील संघाचे अध्यक्ष अँड. किरण जाधव , सचिव अँड. विलास डी. बाविस्कर, उपाध्यक्ष मिलींद बाविस्कर, अँड प्रसाद काबरे, अँड. एस. एफ. जैन, अँड. प्रवीण एच. पाटील, अँड. नितिन चौधरी, अँड. एस. एम. बारी, अँड. उमेश बी. पाटील, अँड. धर्मेंद्र एस. सोनार, अँड. बी. सी. पाटील,अँड. ऐ. व्ही. जैन , अँड. एस. डी. सोनवणे, अँड. अबादास पाटील आदी होते
चोपडा न्यायालयतील दिवाणी व फौजदारी प्रलंबित २०७ वाद ठेवण्यात आले होते त्यातून दिवाणी ४ , फौजदारीचे २ , धनादेश अनादर १७ व पती पत्नीचे वाद अशी एकूण ३२ प्रकरणें निकाली काढण्यात आली २० लाख ५२जार ८२८ रुपये वसूली झाली ट बँक ऑफ इंडिया व बॅंक ऑफ बडोदा यांच्या ११७१ प्रकरणातून ५५ प्रकरणे निकाली काढण्यात आली यात ४० लाख ५३ हजार ३०१ रुपये वसूल करण्यात आले. मराविम शहर ८८९ प्रकरणातून ५ प्रकरण निकाली झाले यात १३ हजार २८० रुपये वसूल करण्यात आले बीएसएनएलच्या ५७ प्रकरणातून एकही प्रकरण निकाली झाले नाही अनेक जुने वाद देखील न्यायालयात मिटविण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे .

या लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी बार असोसिएशन पदाधिकाऱ्यानी व न्यायालयाचे सहाय्यक .अधिक्षक डी. जी. चौधरी, वरीष्ठ लिपिक एस. जी. नगरकर, दिनेश राजपूत, कनिष्ठ लिपिक राजेंद्र ठाकूर , डी. एम. महाजन, एन. डी. कुलकर्णी, एम. बी. बाविस्कर, शिपाई प्रशांत पाटील, प्रवीण पाटील, दिपक महाजन आदिंनी सहकार्य केले. स्टेट बँकचे वरिष्ठ अधिकारी मुकेशकुमार सिंग, शाखा व्यवस्थापक भूषण रंगारी तसेच इतर बँक व्यवस्थापकांनी सहकार्य केले.







