भुसावळ ( प्रतिनिधी ) – विविध कारणामुळे अनेक पदांच्या सरकारी नोकर भरत्या रखडल्या आहेत त्यामुळे वय उलटून जाणाऱ्या उमेदवारांना संधी कायम ठेवण्यासाठी वयोमर्यादा वाढवावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे भुसावळच्या साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी केली आहे

राज्यात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. विविध शासकिय भरत्या मोठया प्रमाणात रखडल्याने बेरोजगार युवक नैराश्यात आहे. काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारच्या आडमुठी धोरणमुळे विविध विभागात शासकीय नोकर भरती प्रक्रिया
रखडल्या आहेत . उमेदवारांची आवश्यक वयोमर्यादा बाद होत असल्यामुळे ते शासकीय नोकरीपासून वंचित राहतील परिणामी बेरोजगारी वाढेल. बऱ्याच वर्षांपासून कधी आरक्षण मुद्दा, कधी न्यायालयिन मुद्दा, कधी राजकीय आडकाठी असल्यामुळे, कधी नैसर्गिक व आरोग्याशी संबंधित आपत्ती आल्यामुळे शासकीय नोकऱ्यांची भरती रखडल्याने, कधी भ्रष्टाचारामुळे, कधी प्रश्नपत्रिका लिक होण्यामुळे सरकारी नोकऱ्यांची भरती झालेली नाही
बेरोजगारांचे वय वाढत असल्याने आवश्यक वयोमर्यादेत हे लोक पात्र होत नाहीत त्यामुळे नैराश्यातून बेरोजगार आत्महत्या करतात. त्यामुळे प्रत्येक संवर्गातील वयोमर्यादा जेवढे वर्ष विलंब झाला असेल, संकट आली असतील तेवढे वर्ष शासनाने वजा करून बेरोजगार उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळावी अशी मागणी भुसावळच्या साई निर्मल फाउंडेशनचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली असल्याचे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.







