पारोळा (प्रतिनिधी) – दोनवर्षोपासुन कोरोनाने जनजीवन विस्कळीत झाले असतांना शाळा , कॉलेजही बंद होती ग्रामिण भागात गरीब विद्यार्थी मोबाईल नसल्यामुळे ते ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असल्याने कामतवाडी येथील माजी सैनिक शिक्षक काशिनाथ शिनकर यांच्या दातृत्वाने शाळेतील गरीब मुलांना रेडमी मोबाईलचे वाटप करण्यात आले
कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येणास सुरुवात झालेली आहे परंतु शाळा अद्याप सुरु झालेल्या नसल्याने शिक्षक ऑनलाईन अभ्यासक्रम घेत असल्याने व गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नसल्याने शिनकर यांनी विद्यार्थाना मोबाईलचे वाटप केले
यावेळी गट विकास अधिकारी सुर्वे, गट शिक्षण अधिकारी चौधरी, जि.प. शाळा कामतवाडीचे शिक्षक लोढे , विजय नावरकर , रविंद्र पाटील, मुख्याध्यापक , शिक्षक , शिक्षिका वृद उपस्थित होते . त्याच्या दातृत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.