जळगाव ( प्रतिनिधी ) – पांझरपोळ परिसरात राहणाऱ्या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनेश कमलाकर ठाकूर (वय-२३ रा.पांझरपोळ चौक ) असे मयत तरूणाचे नाव आहे. दिनेश ठाकूर आई कल्पनाबाई यांच्यासह राहतो. तो एमआयडीसीतील स्टार फेब्रिकेटरमध्ये कामाला आहे. मोठा विवाहित भाऊ गोपाल पत्नीसह धुळे येथे राहतो. दोन महिन्यांपासून त्याचा मुतखडाचा आजार जडला होता. बुधवारी रात्री मित्र गावाहून येत आहे त्याला भेटण्यासाठी जातो असे आईला सांगून घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत घरी आला नव्हता. सकाळी मित्राला काशीबाई कोल्हे महाविद्यालयाजवळील झाडाला त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. पुढील तपास पोहेकॉ संजय शेलार करीत आहे.