जळगाव ( प्रतिनिधी ) – गणेश मूर्ती खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोराने एकाच पॅन्टच्या खिशात ठेवलेला मोबाईल चोरल्याचे उघडकीस आले आहे


मुळचे जामनेर तालुक्यातील रहिवाशी व जैन इरिगेशनमध्ये नोकरी करणारे फिर्यादी गोपाळ कैलास देशमुख यांचा पॅन्टच्या खिशात ठेवलेला सॅमसंग कंपनीचा ए -५० मॉडेलचा १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरांनी चोरून नेला त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजिंठा चौफुली भागात गणपती मूर्ती खरेदीसाठी ते गेलेले होते त्यावेळी मोबाईल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते







