जळगाव ( प्रतिनिधी ) –गोदावरी फाउंडेशन संचालित . उल्हास पाटील विधी विज्ञान व डॉ वर्षा पाटील फॅशन महाविद्यालय येथे आज दि. १४ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.



पारंपरिक वाद्यांच्या गजरात तसेच उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणरायाचे महाविद्यालय परिसरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्राचार्य डॉ झोपे, फॅशनच्या प्राचार्य कविता देशमुख यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली.
यावेळी सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. गणरायाच्या आगमनामुळे संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाने भारावून गेला.









