बोदवड ( प्रतिनिधी ) – गायी चोरणारी टोळी नजरेत पडल्यावर त्यांना रोखताना झालेल्या मारामारीत बोदवडचे २ युवक जखमी झाले ही घटना बोदवड येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजता घडली. दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. जखमीं युवकांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन वाहनांसह आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक औरंगाबादकडे रवाना झाले आहे , असे सागण्यात येत आहे .








