जळगाव ( प्रतिनिधी ) – दिल्लीतील नागरी संरक्षण खात्यातील कर्मचारी राबिया सैफी सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारे निवेदन आज जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिल्लीचे नायब राज्यपाल आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना ऑल इंडिया मजलिस – ए – इत्तेहादुल मुसलमीन यांनी पाठविले

ऑल इंडिया मजलिस – ए – इत्तेहादुल मुसलमीन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राबिया सैफी पिता शमीम या संग्राम विहार , दिल्ली येथे राहत होत्या त्या दिल्ली नागरी संरक्षण खात्यातील कर्मचारी होत्या . त्यांचा मृतदेह सुरजकुंड येथे संशयास्पद स्थितीत आढळला होता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असली तरी या सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडाच्या सखोल तपासाला अद्याप सुरुवात झालेली नाही तो सखोल तपास सीबीआयने करावा अवघे २१ वर्षे वय असलेल्या राबिया सैफी यांची ४ महिन्यांपूर्वीच या खात्यात नेमणूक झाली होती सामूहिक बलात्कारानंतर हत्या झालेल्या राबिया सैफी यांच्या शरीरावर ५० ठिकाणी क्रूरपणे भोसकल्याचे घाव होते
या निवेदनावर शेख अहमद , अँड. इम्रान सय्यद , सय्यद दानिश अहमद , रय्यान जहागीरदार , खालिद खाटीक , सईद शेख , इम्रान शेख , नूर मोहम्मद , शेख असिफ , परवेज शेख आदींच्या सह्या आहेत .







