जळगाव ( प्रतिनिधी ) – ट्रॅक्टर्सच्या ट्रॉल्या चोरून त्या अवैध वाळू वाहतुकीसाठी वापरणाऱ्या २ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे या आरोपींच्या ताब्यातून ३ ट्रॉल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.

जिल्हायात शेतक-यांचे ट्रक्टर व ट्रॉली चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी चोरीस गेलेले शेतक-यांचे ट्रक्टर ट्रॉली चोरट्यांचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीवरून स.फौ अशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे ,पोना नितीन बाविस्कर , प्रीतम पाटील , राहुल पाटील, परेश महाजन, पोकॉ हरीष परदेशी , पोहेकॉ भारत पाटील, विजय चौधरी याचे पथक तयार केले होते.
या पथकाने ट्रॉलीची चोरी करून त्यावर अवैध वाळुची वाहतुक करीत असणारे आरोपी फैजलखान असलमखान पठाण (वय-२१, रा.प्रिंप्राळा वखार जवळ जळगांव) , गोपाल उर्फ विशाल अशोक पाटील ( वय-२९ , रा. खंडेराव नगर पाण्याचे , टाकीजवळ जळगांव) यांच्या मुसक्या आवळल्या
आरोपीतांकडुन गुन्हे उघडकीस आले असुन ट्रक्टर ट्रॉल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुरनं ५९८/२०२१ भा.द,.वि कलम ३७९ या गुन्हयातील १, ०५, ०००/- रू कींमतीची ट्रॉली , धरणगांव पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुरनं ३३९/२०२१ भा.द,.वि कलम ३७९ या गुन्हयातील ८०, ०००/- रू किमतीची ट्रॉली व याच पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुरनं २०२/२०२० भा.द,.वि कलम ३७९ या गुन्हयातील ५०, ०००/- रू किमतीची ट्रॉली हस्तगत करण्यात आली आहे.







