जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील वडली शिवारातून ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची चोरी केल्याचे उघडकीला आले असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात आता ६ महिन्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप प्रेमराज पाटील (वय-४७ , रा. वडली ता.जि.जळगाव) शेती करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे ट्रॅक्टर आणि (एमएच १९ एएन ६७२९ ) क्रमांकाची ट्रक्टर ट्रॉली आहे. २६ मार्चरोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान त्यांनी त्यांच्या मालकीची ट्रॉली वडली शिवारातील त्यांच्या शेताच्या बाजूला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी ट्रक्टरची ट्रॉलीची चोरी केल्याची घटना उघडकीला आली होती. आता सहा महिन्यानंतर ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक स्वप्निल पाटील करीत आहे.