जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यात एकीकडे लसीकरणाला वेग येत असतांना कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने कमी होत असून दिवसभरात जिल्ह्यात एकच रूग्ण आढळून आला आहे.

काल दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ५३ हजारांच्या वर लसींचे डोस देण्यात आले असून यातून नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे. तर, दुसरीकडे कोरोना रूग्णांची संख्या देखील आटोक्यात येऊ लागले आहे. आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रिपोर्टचा विचार केला असता जिल्ह्यात फक्त एक रूग्ण आढळून आला आहे. फक्त अमळनेर तालुक्यात एक रूग्ण आढळला असून इतर १४ तालुक्यांमध्ये एकही पेशंट आढळून आला नाही. तर काल दिवसभरात कोरोनाने एकाही रूग्णाचा बळी गेला नाही. तर आज एक रूग्ण बरा झाला आहे. प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याने कोरोनाची रूग्णसंख्या कमी होतांना दिसून येत आहे.







