• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गर्भाशयातील गुंतागुंत असलेल्या महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया ; गंभीर अँनिमियाग्रस्त महिलेसही दिलासा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोघा महिलांचे वाचले प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 23, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – पोटात दोन गर्भाशय…एक अविकसित… त्यातही गर्भ राहिल्याने महिलेची प्रकृती धोकादायक झाली… कोणतेही रुग्णालय दाखल करेना…अशातच त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने दाखल करून शस्त्रक्रिया करीत जीव वाचविला. याशिवाय एका एचआयव्हीबाधित महिलेचा हिमोग्लोबिन कमी झाल्याने तिचा जीव धोक्यात होता. मात्र तत्काळ औषधोपचार सुरु केल्यामुळे या निराधार असलेल्या महिलेचा जीव वाचला. दोन्ही महिला रुग्णांना सोमवार दि. २३ ऑगस्ट रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते साडी, लोहवाढीच्या गोळ्या, मिठाई व पौष्टिक आहार देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

पिंपळगाव तांडा, ता. जामनेर येथील २३ वर्षीय महिलेच्या पोटात दुखत असल्याने तसेच यापूर्वी दोनवेळा गर्भपात झाल्याने या महिलेची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. अनेक खाजगी रुग्णालयांनी उपचार होणार नाही म्हणून दाखल करून घेतले नाही. अखेर १६ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. येथे स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी महिलेची तपासणी केली.

यात महिलेच्या पोटात दोन गर्भाशय दिसून आले. पैकी एक अविकसित होता. त्यात गर्भ राहिल्याने आणि तोही तुटलेल्या स्थितीत असल्याने तिचा जीव धोक्यात होता. यावेळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून अविकसित गर्भाशय व तुटलेला गर्भ काढून महिलेला निगराणीखाली ठेवले. आता हि महिला बरी झाल्याने सोमवारी २३ रोजी तिला औषधी, साडी, पौष्टिक आहार अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला. यावेळी विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्यासह स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागातील डॉ. श्रद्धा पाटील, डॉ.प्रदीप पुंड, डॉ.सोनाली मुपाडे, डॉ.सुधीर पवनकर, डॉ.कोमल तुपसागर, डॉ. संजीवनी अनेराय, डॉ. चंदन महाजन, डॉ. शीतल ताटे, डॉ. हेमंत पाटील या डॉक्टर्ससह परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

दोघा बहिणींचा जगण्यासाठी संघर्ष अन् रुग्णालयाची साथ !
रावेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी अविवाहित दोन बहिणींचा संघर्ष वेदनादायी आहे. त्यांना आई-वडिलांचे छत्र नाही. दोघांनाही एचआयव्ही आजाराची बाधा आहे. तसेच सांभाळणारे कोणी नाही. त्या एकमेकींना आधार देत जीवन जगत आहेत. जिल्हा रुग्णालयातील एआरटी केंद्रातून त्यांना शिवण मशीन देऊन उत्पन्न मिळविण्यासाठी पूर्वी मदत देण्यात आली आहे. अशातच ११ ऑगस्ट रोजी दोघींपैकी मोठ्या बहिणीची प्रकृती अत्यवस्थ झाल्यामुळे तिला दुसऱ्या बहिणीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तिची रक्ततपासणी केली असता हिमोग्लोबिन १. ४ इतका कमी निघाला. त्यामुळे तत्काळ उपचार सुरु करून ५ रक्ताच्या पिशव्या लावण्यात आल्या. महिलेस आज दि. २३ ऑगस्ट रोजी बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले. प्रसंगी तिच्या बहिणीचीदेखील तपासणी केली असता हिमोग्लोबिन ४ इतका कमी निघाला. तिलाही उपचारासाठी दाखल केलेले आहे. डिसचार्ज देताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्यासह डॉक्टर्स, परिचारिका उपस्थित होते.

डॉक्टरचे असेही दातृत्व

दरम्यान एचआयव्ही बाधित बहिणींची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत म्हणून रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागातील डॉ. सुधीर पवनकर यांनी त्यांचे आजोबा गणेश नारायणराव लिचडे, रा. गोंदिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रोख रक्कम देत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्यांच्या या कृतीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी कौतुक केले.


 

 

Previous Post

विधिमंडळाच्या अंदाज समितीचा उद्यापासून दौरा

Next Post

धानवड येथे 280 नागरीकांना कोविशिल्ड लसीकरणाचा लाभ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धानवड येथे 280 नागरीकांना कोविशिल्ड लसीकरणाचा लाभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !
1xbet russia

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !
1xbet russia

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे
जैन कंपनी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

खाकी वर्दीतील ‘सूरसिंघम’ संघपाल तायडे यांचा ‘उत्कर्ष कलाविष्कार’ पुरस्काराने गौरव !

February 15, 2026
रेल्वेखाली आढळला प्रौढाचा मृतदेह, घातपाताचा नातेवाईकांना संशय !

किरकोळ कारणावरून झाला प्रौढाचा खून, दोन संशयित आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon