एरंडोल (वार्ताहर) – महाराष्ट्र शासनाने (state government ) इ पीक पाणी’ मोबाईल ॲप चे लोकार्पण करण्यात आलेले असून आपल्या शेतातील पीक पाणी आपल्या सातबारा उताऱ्यावर नोंदणी खालील प्रमाणे करता येणार आहे.

मोबाईलवर ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करावा, ॲप मध्ये आपली नोंदणी करावी, आपल्या मोबाईलवर असलेला ओटीपी कायम जतन करून ठेवावी, आपले खाते क्रमांक टाकून संपूर्ण माहिती भरावी, शेतातील पिकांचा फोटो अपलोड करणे, संपूर्ण माहिती तपासून अपलोड करणे ,सदर कार्यक्रम दिनांक 15 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर 2021 कालावधीत भरून घ्यावा या तारखे नंतर भरता येणार नाही तरी यासंबंधी सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यावी व काही अडचणी आल्यास संबंधित गावाच्या तलाठ्याशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी एका पत्रकान्वये केले आहे.







