मुंबई (प्रतिनिधी) स्वरा भास्कर आणि वादग्रस्त वक्तव्ये हे समीकरण काही नवीन नाही. आताही तिने पुुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे पब्लिक तिच्यावर जाम भडकलेली आहे. नेहमी तिच्या वक्तव्यांवर तिला जसे ट्रोल केले जाते तसे यावेळी केले जात नाही म्हणून चक्क तिच्या अटकेची मागणीच केली जात आहे.
त्याला कारणही तसेच आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता मिळवली आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वराने केलेल्या एका पोस्टमध्ये तालिबानची तुलना हिदुत्वाशी केली आहे. ‘तालिबानी दहशतवादामुळे आपण हादरलो आहोत. पण हिदुत्वाच्या दहशतवादाला ठीक म्हणू शकत नाही.
तालिबानच्या दहशतीपुढे आपण शांत राहू शकत नाही आणि आपणच हिंदूंच्या दहशतीवर मात्र केवळ नाराज होतो. शोषण कोण करतो यावर आपली प्रतिक्रिया अवलंबून असू शकत नाही.’ असे स्वराने म्हटले आहे.
यावर चिडलेल्या नेटिझन्सनी थेट स्वरावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तिचे सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक करण्याची मागणी देखील केली जात आहे. त्यासाठी ‘अरेस्ट स्वरा भास्कर’ नावाने एक हॅशटॅग कॅम्पेनदेखील सुरू केले गेले आहे.