जळगाव (प्रतिनिधी ) ;- रस्त्यात गर्दी दिसल्याने काय चालू आहे हे पाहण्यासाठी गेलेल्या आईला तिच्याच मुलाला चौघांकडून मारहाण करीत असल्याचा प्रकार दिसून आला . मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या आईलाही अश्लील शिवीगाळ करीत मारहाण झाल्याची तक्रार दिल्यावरून एमआयडीसी परिसरातील नागसेन नगरात घडली असून याप्रकरणी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच दुसऱ्या तक्रारीत महिलेस अश्लील शिवीगाळ ,मारण्याची धमकी आणि मुलाच्या डोक्यात दगड घालून जखमी केल्याची तक्रार एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिली आहे त्यानुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांची माहिती अशी कि , आपल्या दोन मुलांसह राहणारी ५० वर्षीय महिलेला नागसेन नगर येथे कामावरून परत येत असताना गर्दी दिसल्याने काय प्रकार आहे हे पाहिले असता तिचा मुलगा विजय याला संशयीत वैशाली रोहिदास झाल्टे, सिंधुबाई रोहिदास झाल्टे, रोहिदास झाल्टे व मुकेश झाल्टे हे मारहाण करीत असल्याचे दिसले.मुलाला होत असलेली मारहाण पाहून वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईलाही चौघांनी अश्लील शिवीगाळ करून अंगातील पोत काढून मारहाण केल्याची घटना ४ रोजी घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या तक्रारीत तक्रारदार महिलेने तिच्या मुलाला विजय सोनार याने डोक्यात दगड घालून मारहाण केली . तसेच अश्लील शिवीगाळ केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार महेंद्रसिंग पाटील,संजय धनगर करीत आहे.








