अमळनेर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेची अमळनेर तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या बैठकीत संघटनेच्या कार्यकारणी संदर्भात विविध पैलूंवर चर्चा झाली.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे नाशिक विभाग प्रमुख भालेराव व जिल्हा अध्यक्ष अजय पाटील यांच्याशी चर्चा होऊन अमळनेर तालुका कार्यकारणी गठित करण्यात आली.
यावेळी अमळनेर तालुका अध्यक्ष म्हणून जयेश शिरसाठ यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष विनोद ठाकरे, महिला अध्यक्षा श्रीमती स्नेहल कदम, कार्याध्यक्ष संदीप पवार, सचिव सुर्यकांत पाटील, सहसचिव अनिस खुरेशी, कोषाध्यक्ष प्रशांत पवार, सहकोषाध्यक्ष दिनेश करले, मुख्य संघटक सोपान मोरे, प्रवक्ता सुनील धनगर, प्रसिद्धीप्रमुख अजय भामरे यांची निवड झाली.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे आदी सदस्य उपस्थित होते.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आशिष पवार (सर) , बापूराव पाटील (ठाकरे सर) यांनी अभिनंदन केले.








