• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात ऑफीसबॉयचा साडे नऊ लाखांची हेराफेरी ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 27, 2021
in क्राईम, जळगाव
0

चाळीसगाव (प्रतिनिधी) – ऑफिसमधील टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेल्या चेकच्या सहाय्याने ऑफिसबॉयने ९ लाख ६० हजार रुपये एकाच्या खात्यातून मित्राच्या खात्यात वर्ग केल्याची धक्कादायक घटना शहरातील ‘अमित’ महात्मा फुले सोसायटीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

अरूण त्र्यंबकराव भावसार (वय- ७७) रा. ‘अमित’ महात्मा फुले सोसायटी, भडगाव रोड, ता. चाळीसगाव हे वरील ठिकाणी आपल्या पत्नीसह वास्तव्यास असून गेल्या चाळीस वर्षांपासून वास्तूविशारद (आर्कीटेक्ट) म्हणून कार्यरत आहेत. शहरातील श्रीकृष्ण सिनेमागृह समोर येथे त्यांचे ऑफिस आहेत. सध्या या ऑफिसमध्ये आर्कीटेक्ट कामासाठी संजय मानकर व जयंत बी. जाधव हे अभियंता म्हणून कार्यरत असून राजेंद्र रमेश गहिणे (वय- ३५ रा. जहागिरदारवाडी ता. चाळीसगाव) हे सन २०११ सालापासून ऑफिसबॉय म्हणून काम बघत आहेत. त्याचबरोबर बॅंकेत पैसे भरणे वा काढणे, चेक भरणे, पासबुक भरणे व इतरही कामे ऑफिसबॉय राजेंद्र गहिणे हा करीत असतो. दरम्यान पत्नी मिनल अरूण भावसार (वय-७४) हिचे बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत २०१५ सालापासून बचत खाते आहे. त्यांच्या खात्यात जमा असलेल्या पैशातून पती अरूण भावसार हे लाईट बिल व इतर बिले भरण्यासाठी सह्या केलेली चेक आपल्या ऑफिसमधील टेबलच्या ड्रावरमध्ये ठेवलेले होते. दरम्यान कर सल्लागार संजय खैरनार यांचा फोन आला की, तुमच्या पत्नी मिनल भावसार हिच्या बॅंक ऑफ बडोदाच्या चेक नं. २३ द्वारे खात्यातून २४ मार्च २०२१ रोजी ९,६०,००० रूपये हे नामे कुणाल संतोष शिंदे व्यक्तीच्या खात्यात वर्ग करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर भावसार यांनी ऑफिस गाठून पत्नीने सही केलेली चेकची पाहणी केली असता चेक चोरीला गेल्याचे दिसून आले. मग भावसार यांनी सदर चेक कोणत्या बॅंकेत व केव्हा भरला याविषयी अधिक माहिती घेतली. व ऑफिसबॉय राजेंद्र गहिणे यांचे सुध्दा बॅंक ऑफ बडोदा बॅंकेत (चाळीसगाव शाखा) बचत खाते असल्याने भावसार यांनी १ मार्च ते १९ एप्रिल २०२१ दरम्यानचा बॅंक स्टेटमेंटची माहिती घेतली. तेव्हा त्याच्या खात्यावर २९ मार्च रोजी कुणाल शिंदे या व्यक्तीने दोन वेळा प्रत्येकी ५० हजार रुपये असे एकूण १ लाख रुपये जमा केल्याचे दिसून आले. त्यामुळे ऑफिसबॉय राजेंद्र गहिणे यांनी त्यांच्या ओळखीचे कुणाल शिंदे यांच्या संगनमताने ९,६०,००० रूपये चेक द्वारे रक्कम काढून घेतली असल्याचे खात्री झाल्याने अरूण त्र्यंबकराव भावसार हे चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम- ३८१, ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सैय्यद हे करीत आहेत.


 

 

Previous Post

अमळनेरात सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

नंदगाव शिवारात महावितरण कंपनीच्या अल्यूमिनीअम तारांची चोरी ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नंदगाव शिवारात महावितरण कंपनीच्या अल्यूमिनीअम तारांची चोरी ; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon