• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन कापु नये – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 21, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीने ग्राहकांचा विद्युत पुरवठा कोणतीही पूर्व सूचना न देता कापण्याचा धडाका लावला आहे. धरणगाव तालुक्यातच मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे विद्युत कनेक्शन कापण्यात येत आहेत. कोरोनाची परिस्थिती तसेच कोरोना काळातील विज बिल कमी होईल अशी आशा लोकांना होती . यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिल भरले नाहीत. आणि आता थकबाकी वसुलीची मोहीम राबविली जात असतांना अचानक पणे विद्युत कनेक्शन कापण्यात येत आहेत. यासंदर्भात स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली. पालकमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत आज बुधवार रोजी धरणगाव येथे विद्युत विभागाचे अधिकारी,कार्यकारी अभियंता आर एस पवार, सहाय्यक कार्यकारी अभियंता एस.जी.रेवतकर व धरणगांव अर्बन युनिट चे कनिष्ठ अभियंता एम.बी.धोटे यांची बैठक बोलाविली. यावेळी कोणत्याही ग्राहकाचे विद्युत कनेक्शन अचानकपणे कापु नका असे आदेश गुलाबराव पाटील यांनी दिले.

यावेळी लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष पी.एम.पाटील सर, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शहराध्यक्ष राजेंद्र महाजन, नगरपालिकेचे नगरसेवक, कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. प्रसंगी नवनियुक्त पदाधिकारी पी.एम.पाटील यांची सकल मराठा समाजाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

सदर बैठकीत शिवसैनिकांनी विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत अचानक पणे विद्युत विभागाचे अधिकारी, कर्मचारी घरगुती व व्यापाऱ्यांचे विद्युत कनेक्शन कापत आहेत. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगितले. सध्याच्या बिकट परिस्थितीत नागरिकांना विविध समस्या निर्माण झाल्या असतांना महावितरण कंपनीच्या कठोर भूमिकेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रसंगी धरणगांव विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एस पवार यांनी थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली असून धरणगाव ची मागील वर्षी असलेली १० लाखाची थकबाकी यावर्षी सव्वा कोटी रुपयापर्यंत गेली असल्याचे सांगितले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी कोणत्याही ग्राहकांचे विद्युत कनेक्शन एका एकी कापु नका व बिल भरण्यासाठी ग्राहकाला संधी द्या व तीन टप्प्यात 40 :30 :30 याप्रमाणे टप्पे करून बिलाची वसुली करा.
तसेच धरणगांव पाणी पुरवठा चा एक्स्प्रेस फिटर असुन तेथे नेहमी नेहमी विज पुरवठा खंडित होत असुन त्यामुळे गावातील पाणी पुरवठा उशिराने होत असतो त्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत सदर ठिकाणी विज पुरवठा खंडित होता कामा नये असे आदेश याप्रसंगी त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.


 

 

Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज सहा कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

अंनिस कार्यकर्ता फिरोज शेख यांचे बकरी ईदनिमित्त रक्तदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अंनिस कार्यकर्ता फिरोज शेख यांचे बकरी ईदनिमित्त रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न
1xbet russia

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा
1xbet russia

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

पोलिस अधिकारी सांगून निवृत्त शासकीय कर्मचाऱ्याला १८ लाखांना ऑनलाईन ठकवले!

March 1, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

पाचोऱ्याच्या गो. से. हायस्कूलमध्ये ‘कर्तव्यपूर्ती’ सोहळा उत्साहात संपन्न

March 1, 2026
मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

मेंढपाळाच्या सोन्या-चांदीच्या चोरीचा १२ तासांत छडा

March 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon