• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देशातील विजेच्या मागणीत 18.72 टक्‍के घट झाली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 15, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – ठप्प पडलेले उद्योग-व्यवसाय, तुरळक वाहतूक यामुळे विविध घटकांवर चांगला-वाईट परिणाम होत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, एकीकडे देशातील विजेच्या मागणीत 18.72 टक्‍के घट झाली आहे. त्याचवेळी विजेच्या वापरामुळे होणाऱ्या कार्बन उत्सर्जन घटले असून, त्यामुळे पर्टीक्‍युलेट मॅटर (पीएम) या सर्वात प्रदूषणकारी घटकाची निर्मिती 6.8 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. पर्टीक्‍युलेट मॅटर अर्थात अतिसुक्ष्मकण हा हवेतील सर्वात प्रदूषणकारी घटक आहे. पीएम 10 आणि पीएम 2.5 अशा दोन स्वरुपात तो आढळतो. प्रामुख्याने वाहनातील उत्सर्जन हा त्यामागील प्रमुख स्रोत असला, तरी विजेच्या वापरामुळे होणारे कार्बन उत्सर्जन हादेखील त्यामागील एक महत्त्वाचा स्रोत आहे. सर्वसामान्य परिस्थितीत वाहनांची वर्दळ आणि औद्योगिक उत्सर्जन यामुळे अनेक शहरांच्या हवेत या प्रदूषणकारी घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र, करोनामुळे जगातल्या अनेक देशांना याचा प्रसार रोकण्यासाठी काही कडक पावले उचलावी लागली आहेत. यामुळे दुकाने, मॉल, विमानतळे, रेल्वे स्थानके यांच्या जगमगाटीला विराम लागला असून रस्ते ओसाड व सुन्न पडले आहेत. एवढेच नव्हे तर बरेच मोठे उद्योगांनासुद्धा तात्पुरती कुलपे लागली आहेत. ही अभूतपूर्व स्थिती असल्याने, या परिस्थितीत पर्यावरणावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास अमेरिकेतील शिकागो विद्यापीठाच्या ‘एपिक’ या संस्थेतर्फे केला जात आहे. अमेरिका, भारत, चीन व युरोपीय देश अशा काही प्रमुख देशांमध्ये हा अभ्यास केला जात आहे. संस्थेतर्फे नुकताच हा अभ्यास प्रकाशित केला असून, या अभ्यासानुसार डिसेंबर 2019 ते एप्रिल 2020 या कालावधीत भारतातील विजेच्या मागणीत मोठी तफावत आली आहे. एप्रिल 2020 मध्ये देशातील विजेचा वापर डिसेंबर 2019 च्या तुलनेत 18.72 टक्‍के कमी झाला आहे. तर कार्बन उत्सर्जनात घट होऊन पीएम घटकाची निर्मिती 6.8 टक्‍क्‍यांनी कमी झाली आहे. पुणे शहराचा विचार करता, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागास उन्हाळ्याच्या दिवसांत अकराशे ते किमान तेराशे मेगावॉट वीज रोजच गरजेची असते. तर थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात ही मागणी (प्रतिदिन) हजार मेगावॉट एवढी खाली आलेली असते. मात्र, सध्या लॉकडाऊनमुळे वीजेची मागणी निम्म्याने कमी होऊन ते अगदी 500 ते 600 मेगावॉट एवढी खाली आली आहे. इतकेच नव्हे, तर घरगुती वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांनी करोनामुळे वातानुकुलित यंत्रणा पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे सुद्धा वीजेचा वापर कमी झाल्याचे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


 

 

Previous Post

लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना जीवनावश्यक सेवा मिळण्यात अडचण नको – विधानपरिषदेच्या उपसभापती

Next Post

धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धारावीतील मृतांचा आकडा ७ झाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह
खान्देश

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!
जैन कंपनी

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव येथे जागतिक संधिवात दिनानिमित्त व्यायाम सत्राचे आयोजन
खान्देश

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

October 13, 2026
डॉ. वर्षा पाटील वूमेन्समध्ये ‘फ्रेशर्स स्पॉटलाइट’ उत्साहात
खान्देश

गोदावरी आयएमआर महाविद्यालयात ” फ्रेशर्स स्पॉटलाईट २के२६ ” उत्साहात संपन्न !

October 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

नद्या संस्कृतीचा श्वास – डॉ. राजेंद्र सिंह

October 13, 2026
जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

जिल्हास्तरीय मनपा कॅरम स्पर्धेत दुर्गेश्वरी धोंगडे विजेती!

October 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon