• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे – देवेंद्र फडणवीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2021
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून उघड केल्याने करोनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने चर्चेला घाबरून दोन दिवसात राज्याचे विधीमंडळ अधिवेशन गुंडाळत लोकशाहीला कुलूप बंद करण्याचे काम केले आहे.

तसेच हे अधिवेशन एकतर्फी चालवित भाजप आमदारा विरोधात शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचे आरोप करून आमच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, त्यावेळी आपणही सभागृहात होतो.

तसेच एक जबाबदार पक्षाचा प्रमुख म्हणून पीठासीन अध्यक्ष यांना कोणी शिवीगाळ केली हे योग्यवेळी मी उघड करेल, असा इशारा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी राज्यमंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, राज्यासमोर अनेक प्रश्‍न आहेत. त्यावर अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण होण्यास महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. आम्ही वारंवार शासनाने काय करावे याबाबत सांगत होतो.

मात्र, आघाडी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आघाडी सरकारला उघडे पाडण्याचे काम आम्ही केले. या सर्व बाबींबर अधिवेशनात चर्चा होणे आवश्‍यक होते. मात्र, करोनाचे कारण पुढे करत सरकारने दोन दिवसात हे अधिवेशन गुंडाळले.

राज्यसरकारने एकतर्फी अधिवेशन चालवून आमचे आमदारां विरोधात कपाक्‍ल्पित आरोप करुन त्यांचे वर्षभरासाठी निलंबन केले. ओबीसी आरक्षणाचे मुद्‌द्‌यावरुन सत्तारुढ पक्ष उघड पडल्याने त्यांनी आमच्यावर खोटे आरोप करुन कारवाई केली.

तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच धनगर आरक्षण न मिळण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे सांगत ही आरक्षणे मिळत नाहीत तो पर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच राहणार आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका करताना मोदी सरकारने मंत्री बदलले, पण डबे बदलून उपयोग नाही. तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवे, अशी बोचरी टीका केली होती. पटोलेंच्या या टीकेला आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे. ते पुण्यात बोलत होते.

नाना पटोलेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले की, डबे बदलून उपयोग नाही तर इंजिन बदलायला हवे हे त्यांचे वक्तव्य कॉंग्रेसबद्दल होत का? असा प्रतिसवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले इंजिनचा प्रॉब्लेम हा कॉंग्रेस पक्षाला आहे. जो केंद्रातही आणि राज्यातही असे प्रत्युत्तर दिले.


 

 

Previous Post

देशात पेट्रोल पुन्हा झाले महाग, आपल्या शहराची किंमत तपासा

Next Post

नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांचे शिरसोली येथे भव्य स्वागत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे यांचे शिरसोली येथे भव्य स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर
1xbet russia

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन
1xbet russia

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा
1xbet russia

अमळनेरच्या ७० वर्षीय डॉक्टरला १ कोटी ६५ लाखांचा गंडा

February 22, 2026
भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न
1xbet russia

भुसावळ विभागात येथे मानसिक आरोग्य शिबिर संपन्न

February 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाचोरा तालुक्यातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर

राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंचच ‘प्रशासक’

February 22, 2026
जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगावात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे आयोजन

February 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon