चार जण जखमी ; सध्या गावात तणावपूर्ण शांतता

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील नशिराबाद येथे आज दि.३ जुलै रोजी नऊ ते साडेनऊ वाजे च्या सुमारास दोन गटात जोरदार हाणामारी झाली असून त्यात चार जण जखमी झाले आहेत.
अधिक वृत्त असे की, कुमार दरवाजा परिसरातील भोईवाडा भागात जवळपास शंभरच्या वर लोकांचा जमाव लाठ्या काठ्या हत्यारे घेऊन घुसला.खरे कारण समजून आले नाही. त्यानंतर तेथे अचानक हाणामारी सुरू होऊन तुफान दगडफेक झाली. त्यात तीन पुरुष व एक स्त्री जखमी झाले आहे.

पोfलिसांनी लागलीच धाव घेऊन परिस्थिती आटोक्यात आणली. घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविणकुमार मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ उपपोलीस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे,नशिराबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी पो.नि. रामकृष्ण कुंभार यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून दंगा विरोधी पथक बोलावण्यात आले आहे. १) मजाबाई अशोक भोई वय ६०, चेतन छोटु भोई वय १८ , विनायक मोतीलाल भोई वय २० असे जखमींची नावे समजून आली आहे.








