• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आर.टी.लेले विद्यालयाच्या लिपिकाला मिळाली ३८ वर्षानंतर स्वमालकीची जमीन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 22, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

पहूर कसबे सरपंच शंकर जाधव परिवाराचा असाही प्रामाणिकपणा

पहूर (प्रतिनिधी ) ;- वर्ष इसवी सन १९८४. मुलीच्या लग्नासाठी बापाने आपल्या जिवलग मित्राकडे आपली तीन एकर जमीन १० हजार रुपयांना गहाण ठेवली. लग्न थाटामाटात पार पडलं. दिवस जाऊ लागले, आणि या व्यवहाराचा सर्वांना विसरही पडला. जवळजवळ ३८ वर्षांनी बापाला आपल्या या जमिनीची आठवण होते, आणि आपल्या डॉक्टर मुलाजवळ हा विषय निघतो. डॉक्टर मुलगा वडिलांच्या मित्राच्या मुलाजवळ, जो आज गावचा सरपंच आहे, त्याला भेटून या व्यवहाराची माहिती देतो.

आता, सरपंच असलेला मुलगा नेमकी काय भूमिका घेणार यावर या कथेचा शेवट अवलंबून आहे. शेवटी सरपंच मुलगा आपल्या वडिलांच्या मित्राला भेटतो आणि त्या काळी वडीलांनी गहाण म्हणून घेतलेली जमीन त्यांना त्याच भावात परत करून आपल्या प्रामाणिकपणाची छाप सोडून जातो. अगदी चित्रपटाचा वाटावा असा हा क्षण काल्पनिक नसून, ही सत्य घटना आहे ‘जामनेर तालुक्यातील पहूर कसबे’ या गावातील आर टी लेले विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक ‘सुधाकर बोरसे’ आणि त्यांचे जिवलग मित्र ‘दगडू जाधव’ यांच्या परिवाराची.

पहूर येथील आर. टी. लेले विद्यालयाचे सेवानिवृत्त लिपिक सुधाकर गणेश बोरसे (वय ८४ यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी १९८४ मध्ये, आपले जिवलग मित्र दगडू जाधव यांच्याकडे दहा हजार रुपयांना आपल्या मालकीची तीन एकर जमीन गहाण ठेवली होती. कालांतराने या व्यवहाराचा दोघांनाही विसर पडला. मात्र अचानक २०२१ मध्ये कोरोना काळात या घटनेची सेवानिवृत्त लिपिक सुधाकर बोरसे यांना आठवण झाली; आणि त्यांनी हा विषय आपल्या मुलाला, डॉ. दिनेश बोरसे यांना बोलून दाखवला.

डॉ. दिनेश बोरसे यांनी या व्यवहाराची माहिती वडिलांची मित्र दगडू जाधव यांच्या मुलाला दिली. दगडू जाधव यांचे चिरंजीव शंकर जाधव हे आजच्या घडीला पहूर कसबे गावाचे सरपंच आहेत. या व्यवहाराची माहिती सरपंच जाधव यांना दिल्यावर शंकर जाधव यांनी या विषयासंदर्भात सुधाकर बोरसे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. या व्यवहाराची सरपंच शंकर जाधव यांनी सेवानिवृत्त लिपीक सुधाकर बोरसे यांच्याशी चर्चा केली; आणि कोणताही स्वार्थ न दाखवता सामाजिक कार्यकर्ते युवराज जाधव यांच्या माध्यमातून सुधाकर बोरसे यांची तीन एकर जमीन त्याच भावात त्यांना परत केली.

आजच्या काळात निव्वळ स्वार्थासाठी लुटीचा धंदा करणाऱ्या या जगात, सरपंच शंकर दगडू जाधव यांनी कोणताही मध्यस्थी न ठेवता, आपल्या प्रामाणिकपणाचा बडेजाव अथवा गाव दवंडी न पिटवता बोरसे परिवाराची हक्काची असलेली तीन एकर जमीन त्यांना परत केली. एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही परिस्थिती आजच्या काळात माणुसकीचा झरा आजही प्रांजळपणे वाहत असल्याचे दाखवून देते. सरपंच शंकर जाधव यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. एकीकडे ‘माणुसकी हरवली’ असं म्हटले जात असताना पहुर कसबे गावात मात्र सरपंच शंकर जाधव यांनी आपल्या प्रमाणिकपणाचा आदर्शच गावसमोर ठेवला आहे.


 

 

Previous Post

जि.प.च्या प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी पदासाठी अनेकांकडून मोर्चेबांधणी

Next Post

शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासनाची वाटचाल-ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासनाची वाटचाल-ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
1xbet russia

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी
1xbet russia

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला
1xbet russia

जळगावात घरासमोरून ३५ हजारांची दुचाकी चोरीला

September 16, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 16, 2026
नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

नशिराबादमध्ये २० हजारांची डिझेल चोरी

September 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon