
जळगाव:- पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करुन शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियान 2020-21 अतंर्गत जळगाव जिल्ह्याने राज्यात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकार म्हणून महाराष्ट्र शासनाने निवड केल्याने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचा सत्कार युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश सुभाषराव पाटील यांनी केला.
यावेळी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी उपस्थित होते.







