जळगाव ( प्रतिनिधी ) ;- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सागरपार्क येथे शहर महापालिकेच्या महापौर जयश्रीताई महाजन , उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्याहस्ते आज सकाळी साडेअकरा वाजता वृक्षारोपण करण्यात आले. स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील , नगरसेवक नितीन बरडे , बंटी जोशी , नगरसेविका गायत्री राणे, उज्ज्वला बेंडाळे, , शहर अभियंता अरविंद भोसले , पर्यावरण अधिकारी चंद्रकांत सोनगिरे ,आदी उपस्थित होते .
यावेळी बोलतांना महापौर जयश्रीताई महाजन म्हणाल्या कि सागर पार्क येथे ऑक्सिजन पार्क निर्माण करावयाचे असून कोविडमुळे ऑक्सिजनची गरज असल्याची जाणीव आहे . त्यामुळे पर्यावरण दिनानिमित्त झाडे लावणे आवश्यक असून त्यामुळे ऑक्सिजन प्राप्त होईल असे त्या म्हणाल्या. तसेच उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले कि , प्रत्येकाने आपल्या घरासमोर झाडे लावली पाहिजे. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि त्यांनी जास्तीत जास्त वृक्षारोपण करावे असे कुलभूषण पाटील म्हणाले .