जळगाव ;- शहरातील एका शिक्षिकेच्या बंद घरातून अज्ञात चोरट्यांच्या हाती काहीच सापडले नसल्याने त्यांनी १० महागड्या साड्या चोरून नेल्या. या साड्यांची किंमत जवळपास २५ हजारांची आहे . याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, वृंदा गणपतराव गरुड या जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका असून घर जिवनमोती कॉलनीत आहे. शिक्षीका गरुड यांचे पती पुणे येथे त्यांच्या मुलीकडे गेले होते. दरम्यान वृंदा गरुड या गेल्या एक महिन्यापासून माहेरी धुळे येथे घर बंद करून गेल्या होत्या. संधी साधून अज्ञात चोरटयांनी त्यांच्या घरात प्रवेश करून काही किंमती ऐवज मिळतो का याची पाहणी केली मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही . मात्र त्यांनी १० साड्या चोरून नेल्या. परंतु साड्यांची किंमत २५ हजार रुपये इतकी असल्याने त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.







