मुंबई ( वृत्तसंस्था ) ;- बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला पर्यावरणवादी आहे. सोशल मीडियावरच्या तिच्या अनेक पोस्ट याचा पुरावा आहे. आता तिने थेट भारतात ५ जी टेक्नॉलॉजी लागू करण्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज तिच्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मोबाईल टॉवरमधून निघणा-या हानीकारक रेडिएशनविरोधात जुही गेल्या अनेक वर्षांपासून लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आता भारतात ५ जी टेक्नॉलॉजी आणण्याची तयारी सुरु झाली आहे. अशात या टेक्नॉलॉजीचे संभाव्य धोके बघता तिने यासाठी कायदेशीर मार्ग पत्करला आहे.








