• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ओझर शिवारातील शेत रस्त्याच्या कामाचे आ. चव्हाण यांच्याकडून भूमिपूजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 30, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

चाळीसगाव – डोहर वाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करण्याची मागणी तात्काळ मान्य करून आ. मंगेश चव्हाण यांनी तातडीने या कामाला मंजुरी मिळवून देत भूमिपूजनाचा कार्यक्रम करून आपल्या धडाकेबाज कामांची नेहमीच्या स्टाईलने जाणीव करून दिली.
चाळीसगाव शहरालगत पावर हाऊस व ओझर शिवारात बहुतांश शेती ही चाळीसगाव शहरात पूर्वापार राहणाऱ्या चौधरी समाजाची आहे.
या शेतांमध्ये जाण्यासाठी असणारा मुख्य रस्ता हा दगडमातीचा कच्चा असल्याने व त्यावर ठिकठिकाणी मोठं मोठे खड्डे असल्याने सदर रस्ता दुरुस्तीची मागणी सदर शेतकरी बांधव गेल्या ४० वर्षांपासून करत होते.
त्यातच मागील २ दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे व गुरा ढोरांचे त्याचप्रमाणे हातमजुरी करणाऱ्या मजुरांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचल्याने त्यावर पायी चालणे देखील कठीण झाले होते. हा त्रास सदर शेतकऱ्यांना दर पावसाळ्यात होत असल्याने मोठ्या कष्टाने पिकविलेला शेतमाल वेळेत बाजारात आणणे दुरापास्त होत होते.
ही सर्व अडचण घेऊन या त्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या प्रमुख प्रतिनिधी सोबत आमदार मंगेश चव्हाण यांची दि.२९ मे रोजी सकाळी भेट घेतली व आपल्या स्थानिक विकास निधीतून डोहर वाड्यापासून ते नाल्यापर्यंतचा रस्ता खडीकरण करून देण्याची विनंती केली. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील शेतकऱ्यांची गेल्या अनेक वर्षांपासून असलेली समस्या समजून घेतली व त्यांना विचारले की किती निधी दिला तर हा रस्ता तयार होईल. त्यावर शेतकऱ्यांनी सांगितले की खडीकरण करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल जवळच उपलब्ध आहे तसेच हे काम आम्ही कुठल्याही आर्थिक दृष्टिकोन ठेवून न करता स्वतः उभे राहून करणार असल्याने शासनाच्या अंदाजपत्रकापेक्षा जास्त आणि टिकाऊ काम आम्ही करून घेऊ कारण या रस्त्यावरच आमचे शेतीचे अर्थकारण अवलंबून आहे.
आमदार मंगेश चव्हाण यांनीदेखील शेतकऱ्यांची प्रामाणिक तळमळ बघत आपल्या निधीतून तात्काळ ५ लाख रुपये देण्याचे जाहीर केले व तेव्हड्यावरच न थांबता काही दिवसातच पावसाळा सुरू होणार आहे. शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना आता शेतात जास्त जावे लागणार आहे. त्यामुळे निधीचे पत्र दिल्यानंतर त्या कामाला मान्यता मिळण्यासाठी जवळपास एक ते दीड महिना लागेल, काम होईपर्यंत अर्धा पावसाळा निघून जाईल. म्हणून आमदार मंगेशदादा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे ठेकेदार विजय चौधरी यांना बोलावून घेत त्यांना सदर कामाची जबाबदारी दिली व सांगितले की “तुम्ही आताच दुपारी माझ्या निधीचे ५ लाखांचे पत्र घ्या, तो निधी मंजूर होईल तेव्हा होईल, तुमचा कष्टाचा एक रुपया बुडणार नाही, त्याची जबाबदारी मी घेतो मात्र मला या शेतरस्त्याचे काम आजच संध्याकाळी सुरू झालेल पाहिजे. मी स्वतः संध्याकाळी तेथे नारळ फोडायला येतो. आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तडकाफडकी घेतलेला निर्णय पाहून उपस्थित शेतकरी देखील भारावले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते नारळ फोडून या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील झाले.
यावेळी जेष्ठ नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील, नगरसेवक बापू अहिरे, सामाजिक कार्यकर्ते सदानंदभाऊ चौधरी, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, अनिल ठाकरे चौधरी, अमोलचौधरी, भाजपा कार्यकर्ते मयूर चौधरी यांच्यासह शेतकरी सचिन चौधरी, उमाकांत चौधरी, दत्तात्रय चौधरी, दिनकर चौधरी, गोपाल चौधरी, सुनील चौधरी, चंद्रकांत चौधरी, पोपट चौधरी, मोहन चौधरी, भूषण चौधरी, चेतन चौधरी, रोहिदास चौधरी, अनिल चौधरी, सुनील चौधरी, नामदेव चौधरी, सोनू चौधरी, सुदाम चौधरी, अशोक चौधरी, लक्ष्मीकांत चौधरी, जिभु चौधरी, धनंजय चौधरी, प्रल्हाद चौधरी आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

पाचोरा कृउबा समितीच्या मुख्य प्रशासकचा माजी आ. दिलीप वाघ यांनी स्वीकारला पदभार

Next Post

मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जळगावात काँग्रेसकडून निषेध आंदोलन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मोदी सरकारला ७ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जळगावात काँग्रेसकडून निषेध आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon