जळगाव : –संपूर्ण जगात 31 मे हा जागतिक तंबाकू विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच उद्या रविवार दि. 30 मे रोजी सकाळी 11 वाजता वेबिनारचे आयोजन केले जाणार आहे. सुप्रसिद्ध व्यसनमुक्ती तज्ज्ञ डॉ. सचिन परब, मुंबई यांचे अनुभवयुक्त मार्गदर्शन यात मिळेल.

ब्रह्माकुमारीज् मेडिकल प्रभाग संचलित उडान व्यसनमुक्ती केंद्र, ब्रह्माकुमारीज् जळगाव तर्फे सदरहू वेबिनारचे आयोजन केले जात आहे. तंबाकू तसेच तंबाकूजन्य पदार्थ वीडी, सिगरेट, गुटका आणि इतरांच्या सेवनामुळे लाखो लोकांचा जीव जातो. या व्यसनापासून सुटण्याची मनस्वी इच्छा असतांनाही ती सुटू शकत नाही, मात्र योग्य सवयी आणि नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास यात यश निश्चित मिळते. या संदर्भात मुंबई येथील सुप्रसिद्ध व्यसनमुक्ती तज्ज्ञ आणि ग्लोबल इनिशिएटीव फॉर टोबेको अवेरनेसचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सचिन परब यांचे मार्गदर्शन वेबिनार मध्ये मिळणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारों लोक व्यसनमुक्त आणि आनंदी आयुष्य जगत आहेत. याबरोबरच जळगाव येथील सौ. चेतना नितिन विसपुते, अध्यक्षा चेतना व्यसनमुक्ती केंद्र, डॉ. किरण पाटील, रेडिओलॉजिस्ट, डॉ. विशाखा गर्गे, मेडिकल प्रभाग, जळगाव, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांचेही मार्गदर्शन मिळणार आहे.
हे वेबिनार युट्यूबवर रविवारी सकाळी 11 वाजता पाहता येईल त्यासाठी http://tiny.cc/bkcommit ही लिंक असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केली आहे.







