मुंबई (वृत्तसंस्था) –परिवहन विभागात बदल्यांचं रॅकेट चालत असून उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे बदल्या मॅनेज करत असून अर्थपूर्ण व्यवहार करत आहेत. त्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांचं अभय आहे, असा दावा गजेंद्र पाटील यांनी केला असून याप्रकरणी त्यांना पंटवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक होते. पाटील यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या उपायुक्तांना दिले आहेत.

अनिल परब यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार दाखल झाल्यानंतर आता राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. विरोधी पक्षाकडून अनिल परब यांच्यावर टीका होत असून मनसे नंतर आता भाजपाने पुन्हा महाविकास आघाडी सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे नेते नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे कोकणी भाषेत अनिल परब यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला आहे.







