जळगाव;- लेखक गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रिनयसेन्स स्टेट’ पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला, तो दुरुस्त करावा अन्यथा या पुस्तकावर बंदी आणून छत्रपती संभाजी महाराजांची होणारी बदनामी थांबवावी अशी मागणी माजी उपमहापौर सुनील खडके यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या ‘रिनयसेन्स स्टेट’ पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज ह्यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला असून तो दुरुस्त करण्यात यावा. या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज यांची होत असलेली बदनामी थांविण्यासाठी चुकीचे लिखाणाची दुरुस्त करण्यात यावी अन्यथा या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी माजी उपमहापौर सुनील खडके यांनी केली आहे. याप्रसंगी निखिल पाटील, भिराज सोनवणे, वेदांत चालसे, सोहम खडके, हर्षल पाटील, भुषण चौधरी आदी उपस्थित होते.







