जळगाव (प्रतिनिधी) – सदरील टायगर ग्रुप मार्फत पै.तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व उत्तर महाराष्ट्रचा बुलंद आवाज पै.सागर भाऊ कांबळे, पै.ऋषीकेश बाबा भांडारकर, टायगर ग्रुप खान्देश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शिरसोली येथील टायगर ग्रुपचे सदस्य मोहन भाऊ ठाकरे यांच्या वाढदिवस औचित्य साधून होतकरू व गरीब लोकांना मोहन भाऊ ठाकरे भाऊ यांच्या हस्ते वाढदिवस निमित्त ‘बिस्कीट पॉकेट व पाणी बॉटल’ वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
सदरील कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्याकरिता टायगर ग्रुपचे सदस्य कुणाल बारी; बंटी ताडे, हर्षल सुरवाडे, फिरोज तडवी, गणेश वानखेडे; गौरव उमप; मनोज बाविस्कर; तौशिप पिंजारी; चेतन चौधरी; शुभम शिंपी; तेजस काटोले, अजय जाधव; विशाल इंगळे; दिनेश नाईक; आदिंनी परिश्रम घेतले होते.