नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत.सलग तीन दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर काहीशी घट पाहायला मिळत आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 17 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 59 हजार 591 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
मात्र कोरोनाबळींचा आकडा पुन्हा एकदा वाढला आहे. कालच्या दिवसात 4 हजार 209 कोरोनाग्रस्तांचा मृत्यु झाला आहे. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 295 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
राज्यात गेल्या 24 तासांत 29911 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 47371कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 5026308 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 383253 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 91.43% झाले आहे.