जळगाव (प्रतिनिधी ) ;- रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद असणाऱ्या एका फरार आरोपीला नाशिक येथून पोलिसांनी अटक केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरोक्षक किरण कुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या स.फौ./राजेद्र पाटील , पो.हवा./अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी पो.ना./रावसाहेब पाटोल यांच्या पथकाने आरोपी गौतम मनोहर लहाने रा.पांडव नगरी नाशिक याच्यावर
रामानंद नगर पोलीस स्टेशन भाग.५ गुरन.-१६३/२०१८ भा.द.वि. कलम-४२०,४६५ या गुन्ह्यातील गुन्हा घडल्या पासुन फरार होता . त्याला नाशिक येथून अटक केली असून पुढील कारवाईसाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनला पुढील तपासकामी सोपविण्यात आले आहे.