चाळीसगाव ;- आज रोजी चाळीसगाव शहर पोस्टे हद्दीत चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ते घाट रोड, नागद रोड, सदर बाजार, स्टेशन रोड, भडगाव रोड, खरजई रोड मार्ग चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन पावेतो रूट मार्च काढण्यात येवुन चाळीसगाव शहरातील नागरिकांना जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे आदेशानुसार लागू करण्यात आलेली संचार बंदी, जमावबंदी , तसेच आगामी येणारी शब्बे बारात या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोस्टे मोबाईल पी.ए.सिस्टिम वरून सूचना देण्यात आल्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी .कैलास गावडे तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सपोनि रावसाहेब कीर्तीकर शहर वाहतूक शाखा यांचे सह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन अधिकारी व कर्मचारी ERT पथक ,पो.मु.कडील स्ट्रकिग फोर्स असे उपस्थित होते .