जळगाव ;- कोरोना प्रतिबंधासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी मंगळवारी पोलिसांनी वाहनधारकांची तपासणी केली. जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मार्किंग वॉक करणारे, विनाकारण फिरणारे, विनामास्क, विनाहेल्मेट अशा एकूण ६२ नागरिकांविरुध्द कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी टॉवर चौक,पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर, ख्वाॅजामिया चौक, आकाशवाणी चौक अशा विविध चौकात वाहनधारकांची तपासणी केली. रात्रीही पोलिसांकडून वाहनधारकांची तपासणी करण्यात आली. मॉर्निंग वॉकसह विनाकारण फिरणारे ४९, विना हेल्मेट १०, विनामास्क ३ अशा ६२ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.








