जळगाव ;- महावितरण विभागाकडून नागरिकांचे वीज मीटर घरात न राहू देता बाहेर खांबावर लावले जात असल्याने ग्राहकांना वीजबिल भरमसाठ येत असल्याने महावितरणच्या या गलथान कारभाराबाबत नागरिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना याबाबत निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, शिवाजी नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून वीज मीटर बाहेर काढून खांबावरील डीपीवर लावण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना १० हजार,१२ हजार, १४ हजार असे बिल आले आहे . याबाबत सहाय्य्क अभियंता हर्षल इंगळे यांच्याकडे तक्रार दिली होती . मात्र याबाबत टाळाटाळ होत असल्याची तक्रार पालकमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिनतबी रंगरेज, विजय क्षीरसागर, पप्पू पगारे, साबीर तौफिक, शाहीन बी सत्तर, इब्राहिम सैय्यद, आरती राणा, रजनी नेवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.