पारोळा ;- पारोळा तालुक्यातील विचखेडे येथे आज पहाटे एका शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागल्याने ४ बकऱ्या आणि २ बोकडांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले . यात शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान झाले.
आज सोमवार १० रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास विचखेडे येथे सुपडू सूर्यवंशी हे वाॅचमन म्हणून कामाला गेले होते. घरात पत्नी व दोन मुले झोपली होती. त्यावेळी घराला अचानक आग लागली. शेजाऱ्यानी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र ती आटोक्यात येत नसल्याने पारोळा पालिकेच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात आली.
अग्निशामक दलाचे कर्मचारी मनोज पाटील व सहकाऱ्यांनी आग विझवली. पण अंगणात बांधलेले बोकड, बकऱ्या, कोंबड्या, संसारोपयोगी साहित्य आदी खाक झाले.
यावेळी घटनास्थळी उपसरपंच पंकज बाविस्कर यांनी मदत केली. तलाठी सचिन आठोले, पोलीस सरपंच आदींनी घटनेचा पंचनामा केला. यावेळी गावातील रवी पानपाटील, गणपत गायकवाड, गौतम सूर्यवंशी, वैभव पाटील, अक्षय शिरोळे, दीपक सोनवणे, अनिल माळी, बापू गढरी, योगेश कोळी, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.