जळगाव;-जळगाव जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असून लसीकरण सुरू आहे. जळगाव बार मधील न्यायालयाच्या कर्मचारी संघटनेला लसचे डोस उपलब्ध झाले आहेत. त्यात कर्मचारी त्यांचे कुटुंब ह्याना व काही ज्येष्ट वकील यांना लसीकरण उत्तम प्रकारे सुरू आहे. मात्र नवोदित वकिलांना कोरोना लस उपलब्ध करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस जळगाव शहर सचिव अँड. कुणाल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.