मुंबई (वृत्तसंस्था) – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांची विजयाकडे वाटचाल दिसून येत आहे. आवताडे हे सध्या आघाडीवर असून त्यांचा विजय पक्क समजला जात आहे. यापार्श्वभुमीवर भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी एक ट्विट केले आहे. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’ असं म्हणत पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलीय.

नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार. असं म्हणत पडळकरांनी आवताडेंना विजयी घोषित केलेय.
दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव झाला आहे. ही निवडणुक राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. त्या अनुषंगाने जोरदार सभा देखील पंढरपूर मध्ये रंगल्या होत्या. दरम्यान तीन पक्ष एकत्र येऊनही भाजपचा झालेला विजय महाविकास आघाडी साठी खूप मोठा धक्का मानला जात आहे.







