• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सिद्धूंनी पटियाळातून निवडणूक लढवावी ; पंजाबचे CM अमरिंदर सिंगांचे आव्हान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 29, 2021
in भारत
0

चंदीगड (वृत्तसंस्था) – पंजाबमध्ये काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलं आहे. एकेकाळी जवळ असलेले मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यात दरी निर्माण झाली आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मागील काही दिवसांपासून सिद्धू यांनी मुख्यमंत्री अमरिंदर यांच्यावर टीका करत आहेत. सिद्धू यांच्या टीकेला मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी उत्तर दिले आहे. अमृतसरचे आमदार असलेल्या सिद्धूंनी पटियाळातून माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवावी, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे आव्हान अमरिंदर सिंग यांनी दिले आहे.

अमरिंदर सिंग म्हणाले, ते रोज काही तरी बोलत असतात. त्यांनी वक्तव्य केले नाही असा एकही दिवस जात नाही. माझ्यावर टीका करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताच अजेंडा नाही. ते कोणत्या पक्षात आहेत हेच त्यांना माहिती नाही. जर ते काँग्रेसमध्ये असतील तर ते शिस्तभंग करत आहेत. त्यांना या प्रकारचे वक्तव्य करण्याची गरज काय ? ते बहुधा आम आदमी पक्षामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण भाजप त्यांना पुन्हा परत घेणार नाही. अकाली दलाबाबतही तीच परिस्थिती आहे. ते कुठं जातील ? एकतर आमच्या पक्षात राहतील किंवा बाहेर पडतील, अशी टीका त्यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

सिद्धू आणि त्यांच्या पत्नी नवजोत कौर हे अमरिंदर सिंह यांच्या पटियाळा मतदारसंघात प्रचार करण्यासाठी येणार का ? असा प्रश्न अमरिंदर यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी सिद्धू यांना आव्हान दिले. सिद्धू यांचं पटियाळामध्ये स्वागत आहे. त्यांना पटियाळामध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवता येणार नाही. मागच्यावेळी जनरल जेजे सिंग निवडणुकीला उभे होते. त्यांचे डिपॉझिट जप्त झालं. सिद्धूंचीही अवस्था तीच होईल, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, सिद्धू यांनी सोशल मीडिया अकाउंटवरुन काँग्रेसचं नाव हटवलं आहे. यासोबतच मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात वक्तव्य केले आहे. कोटकपुरा आणि बहिबल कलां गोळीबार प्रकरणी एसआयटी चौकशी रद्द केल्याने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव न घेता त्यांच्यावरही टीका केली. हम तो डुबेंगे सनम, तुम्हे भी ले डुबेंगे, असं सिद्धूंनी सोशल मीडियावर लिहिलं. हे सरकार आणि पक्षाचे अपयश आहे. पण एका व्यक्तीने दोषींसोबत हातमिळवणी केली आहे, असंही सिद्धू म्हणाले.


 

 

Previous Post

E-Pass बनावट पध्दतीनं तयार करून देणार्‍याला गुन्हे शाखेकडून अटक

Next Post

पॉलीहाऊसच्या बाजूला असणाऱ्या शेताला आग ; मनपाच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पॉलीहाऊसच्या बाजूला असणाऱ्या शेताला आग ; मनपाच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!
1xbet russia

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

महापौर दीपमाला काळे यांच्या सुचनेनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये : शहरातील सर्व मार्केटमध्ये दोनदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम

March 2, 2026
भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

भावूक… खुशखुशीत… हास्यविनोद अन भावनांचा मेळ..!

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon